प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात मागील आठवडय़ाच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होते. मागील 24 तासात राज्यात 1501 नव्या बाधितांची नेंद झाली. तर दिवसभरात 2039 जण कोरोनामुक्त झाले. तर 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थबुलेटीननुसार राज्यात आतापर्यंत 28,97,664 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 28,38,717 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण 36,437 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 22,487 इतकी आहे. मागील 24 तासांत 1,02,494 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.46 टक्के इतका आहे.