बेळगाव / प्रतिनिधी
दिवसभर शांत असणारी रविवारपेठ सायंकाळच्या वेळेत गजबजलेली दिसून येत आहे. घाऊक दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. दुकानदारांना किराणा माल उपलब्ध व्हावा, यासाठी सायंकाळच्या वेळेत घाऊक व्यापाऱयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक दिसून आले.
नागरिकांनी आपापल्या परिसरातील किराणा दुकानांतून माल खरेदी करावा, गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. तरीदेखील किरकोळ खरेदीदार गर्दी करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी बॅरिकेड्स उभे करून अनेक ठिकाणी रविवारपेठला जाणाऱया रस्त्यांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गल्लीबोळात बॅरिकेड्स लावून शहरातील सर्वच रस्ते बंद केल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे.
रविवारपेठ येथील नव्या व्यवस्थेच्या संदर्भात काही व्यापाऱयांनी तीव्र नाराजी क्यक्त केली. सायंकाळच्या वेळेत रविवारपेठ वगळता शहराच्या इतरत्र भागात शांतता पाहायला मिळत आहे. दरम्यान, घाऊक क्यापाऱयांना मुभा देण्यात आल्याने गर्दी होत आहे. किराणा दुकानदारांनी ठरल्या वेळेतच खरेदी करावी, असे आवाहन करूनदेखील किराणा दुकानदारांबरोबर किरकोळ बाजारासाठी गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे गोंधळ उडत आहे. सायंकाळी 6 ते 10 या वेळेत खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या मर्यादित वेळेतच खरेदी करावी लागत असल्याने वर्दळही वाढलेली दिसून येत आहे. काही जणांना बाजाराविना माघारी परतावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांची कोंडी होत आहे. सायंकाळच्या वेळेत होलसेल व्यापाऱयांना परवानगी दिली असली तरी शहरात दिवसभर हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद असलेली पाहायला मिळत आहे.