इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ; सव्वा नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिणे, एक दुचाकी, एक मोबाईल असा 5 लाख 76 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्दमाल जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिवसा घरफोडी करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. लोकेश रावसाहेब सुतार (वय 26, रा. खटाव रोड, पाटील मळा, लिंगनूर ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे साडे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी, एक मोबाईल असा 5 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने एक महिन्यापूर्वी संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील बंद घरफोडून त्यामध्ये चोरी केली होती. त्या चोरीच्या गुह्यातील सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, जयसिंगपूर – कोल्हापूर मार्गावरील निमशिरगांव गावच्या हद्दीत एक युवक दुचाकीवरुन सोन्याचे दागिणे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन या परिसरात सापळा लावून दुचाकीवरुन संशयीत फिरणार्या लोकेश सुतार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता सोन्याचे गंठण, चेन, अंगठ्या असे 93 ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. याबाबत केलेल्या चौकशीत त्याने महिन्याभरापूर्वी संभाजीपूर येथे बंद घर फोडून सदरचे दागिने लांबविल्याची कबुली दिली.
सुतार विरोधी 27 घरफोड्या केल्याचे गुन्हे
घरफोड्या सुतार हा पोलीस रेकॉर्डवरील चोरटा असून, त्याच्याविरोधी सातारा, नवी मुंबई, कवठेमहांकाळ, इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगांव तसेच कर्नाटकातील अथणी, बिळगी, जमखंडी आदी ठिकाणी 27 घरफोडÎा केल्याचे गुन्हे नोद आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस कर्मचारी संभाजी भोसले, राजीव शिंदे, महेश खोत, रणजित पाटील, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, शहनाज कनवाडे, राजू कांबळे, यशवंत कुंभार तसेच सायबर विभागाचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड सहभागी झाले होते.