प्रतिनिधी/ सातारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी पर्यटनस्थळे अटी शर्थीवर सुरू ठेवण्याची परवानगी दिली गेल्याने जिह्यातील पर्यटनस्थळे शनिवार, रविवारी गजबजू लागली आहेत. कोरोनाचा आकडा कमी होत असल्याने जिकडे तिकडे दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे. हळूहळू नागरिक मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अहवालात बाधित आढळून आले तर दिवसभरात 11 जणांचा बळी गेला असून मृत्यू दर ही कमी होत आहे. दरम्यान, या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
जिह्यात आतापर्यंत 2 लाख 5 हजार 509 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यापैकी 47 हजार 754 जण बाधित आढळून आले असून शनिवारी दिवसभरात …. वाढ झाली आहे. 43 हजार 638 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 1 हजार 603 जण कोरोनामुळे बळी पडले आहेत. अजून 2 हजार 663 जण उपचार घेत आहेत. आता दररोज बाधित होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. अजून कमी प्रमाण होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा सुरू या उपक्रमाअंतर्गत काही बाबी सुरू करण्याची परवानगी दिली गेली असली तरीही अजून त्या बाबी सुरू झाल्या नाही. पर्यटन स्थळे मात्र गजबजून जाऊ लागली आहेत. कोरोनामुळे सुट्टी असली तरीही शासकीय सुट्टी ही शनिवार, रविवारीच असल्याने पर्यटनस्थळी गर्दी होत असून तेथील व्यावसायिक काळजी घेत आहेत.
150 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या शनिवारी संध्याकाळपर्यंत 150 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 339 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
211 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड येथील 10, कोरेगांव येथील 34, वाई येथील 15, खंडाळा येथील 8, रायगांव येथील 37, पानमळेवाडी येथील 4, मायणी येथील 10, महाबळेश्वर येथील 1, दहिवडी येथील 4, खावली येथील 3, म्हसवड येथे 24 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 43 असे एकूण 211 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे.
आता मृत्युदर घटतोय
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सुलतानपूर (ता. वाई) येथील 71 वर्षीय पुरुष, आदित्यनगरी (ता. सातारा) येथील 62 वर्षीय पुरुष तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये साखरवाडी (ता. फलटण) येथील 78 वर्षीय पुरुष, पाटण येथील 76 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले खेड (ता. सातारा) येथील 73 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, साठेवाडी (ता. कोरेगाव) येथील 74 वर्षीय पुरुष, करंजे पठ, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, जकात नाका करंजे सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.