पुजारी इलेक्ट्रॉनिक्सला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध ऑफर्समुळे कणकवलीत ग्राहकांना लाभ
कणकवली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर आर्थिक मंदीचे सावट असतानाच येथील अल्पावधीत सर्वदूर नावाजलेल्या अशा पुजारी इलेक्ट्रॉनिक्सने लोकांचे हित व गैरसोय दूर करण्यासाठी दिवाळी बंपर धमाका सुरू केला आहे. ग्राहकांची परिस्थिती, त्यांची अडचण ओळखून पुजारी इलेक्ट्रॉनिक्सतर्फे खास ग्राहकांना त्यांना परवडेल, त्यांच्या सोईनुसार अशा विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ग्राहकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर अगदी शून्य टक्के व्याजदरासह खरेदीवर 10 ते 30 टक्के सुट व आकर्षक भेटवस्तूंची खैरात जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरगुती वापराच्या वस्तूंसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे अगदी किफायतशीर व फायदेशीर ठरणार आहे.
सध्या जगभर कोरोना महामारीमुळे जनता आर्थिक मंदीला तोंड देत आहे. गेल्या काही महिन्यात वस्तू खरेदीकडे ग्राहकांनी बऱयापैकी पाठ फिरविली आहे. या आर्थिक मंदीतही सर्वसामान्य ग्राहकांच्या मूलभूत गरजा भागवितानाच नफा कमी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक अशोक पुजारे यांनी या दिवाळीसाठी खास दिवाळी बंपर धमाका जाहीर केला आहे. गेली 20 वर्षे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ग्राहकांना विकतानाच ग्राहकांचे हित व फायद्याकडे नेहमीच लक्ष दिले आहे. त्यामुळे शहरातील पुजारी इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्राहक आर्थिक अडचणीमुळे घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यापासून वंचित राहू नये म्हणून अशोक पुजारे यांनी वाहनांमध्ये वस्तू ठेवून जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्यात ऐन दिवाळीत ग्राहकांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी घरगुती खरेदी करता याव्यात, यासाठी खास दिवाळी धमाका योजना जाहीर केली आहे. या दुकानात मिळणाऱया सर्व काही हप्त्यांवर 0 टक्के व्याज दराने आहेतच. पण खास धमाका म्हणून विविध नामांकीत कंपन्यांचे फ्रीज, एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 10 ते 30 टक्के इतका भरघोस डिस्काऊंट जाहीर केला आहे. त्याचबरोबर इस्त्राr, फ्रायपॅन, सफारी बॅग आदी वस्तूंच्या खरेदीवर भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. विक्रीनंतर सेवा, रिपेअरिंग व सर्व्हिसिंग आदी सेवा देण्यात येणार आहे.
त्यामुळे या दिवाळीत पैशाची अधिक चिंता न करता, थेट आमच्या दुकानात या, घरगुती व गरजेच्या वस्तू खरेदी करा व कोरोना हद्दपार करत असतानाच दिवाळीचाही आनंद घ्या, असे आवाहनच पुजारी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. खरेदीसाठी ग्राहकांना भरपूर सुट जाहीर केली असतानाच मर्यादित नियमावलीही घालून देण्यात आली आहे. या दिवाळी बंपर धमाकाचा ग्राहकांनी फायदा घेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याचे आवाहन संचालक अशोक पुजारे यांनी केले असून अधिक माहितीसाठी 9850242981 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.