ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेश सरकारने दिवाळीपूर्वीच एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चिनी आणि विदेशी फटाक्यांची साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, चिनी आणि अन्य फटाक्यांच्या आयातीवर विना परवाना पूर्णपणे बंदी आहे. तसेच डायरेक्ट जनरल फॉरेन ट्रेडद्वारे मी आणि अन्य परदेशी फटाक्यांची आयात करण्यास परवानगी देण्यात आली नाही आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. याव्यतिरिक्त आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. दिवाळीत मातीच्या पणत्या खरेदी करा, जेणे करून स्थानिकांना रोजगार मिळेल असेही त्यांनी सांगितले.