विविध मार्गांवर धावल्या जादा बसेस
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीकाळात परिवहनने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बससेवा पुरविली होती. या बससेवेच्या माध्यमातून परिवहनला 20 लाखाचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दिवाळीकाळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन परिवहनने विविध मार्गांवर 71 हून अधिक जादा बस सोडल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिवाळीसाठी चालविलेल्या बससेवेच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीसाठी बसस्थानकातून मुंबई, पुणे, पणजी, बेंगळूर, नाशिक, मंगळूर, हैदराबाद, म्हैसूर आणि गोव्याला जादा बस धावल्या. दरम्यान कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने ये-जा करणाऱयांची संख्यादेखील वाढली. त्यामुळे परिवहनच्या जादा बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला. दिवाळीकाळात लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीजमुळे सलग सुटय़ा मिळाल्या होत्या. त्यामुळे मूळगावी परतणाऱया प्रवाशांची संख्या वाढली होती. शिवाय परिवहनने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन बुकिंग व्यवस्था केली होती. त्यामुळे परिवहनला दिवाळीच्या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त झाला.
परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर केएसआरटीसी मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍपच्या माध्यमातून बुकिंग करता येते. या ऍपचा आधार घेत अनेक प्रवाशांनी घरबसल्या तिकीट बुकिंग केले. त्यामुळे परिवहनलाही प्रवासी मिळाले.