बेंगळूर / प्रतिनिधी
दिवाळीनंतर मुजराई विभागाच्या अंतर्गत मंदिरांमधील सेवा डिजिटल होतील. मंदिर निधीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यतील मंदिरांमध्ये सेवा, प्रसाद किंवा इतरसोईसाठी डिजिटल पेमेंट सुरू करेल,असे प्रसिद्दीपत्रकात म्हटले आहे.
सुरुवातीला ही डिजिटल सुविधा, सर्व ‘अ’वर्गाच्या मंदिरांमध्ये लागू केली जाईल आणि नंतर ‘ब’ आणि ‘क’ वर्ग मंदिरांमध्ये चालु करण्यात येईल. अधिकार्यांच्या मते, जगाभरातील भाविक कोठूनही वेबसाइटवर मंदिरे निवडू शकतात आणि गेटवे वापरून पैसे भरुन रांगेत न थांबता कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकतात.
धार्मिक बंदोबस्त (मुझराई), हज आणि वक्फ मंत्री, शशिकला जोल्ले म्हणाल्या,”या योजनेमुळे मंदिर प्रशासनात पारदर्शकता आणण्यास मदत होईल. शिवाय, सरकार भाविकांना सामावून घेण्यासाठी मंदिरे आणि आसपासच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अर्पण आणि देणग्यांचा प्रभावीपणे वापर करू शकते.”