विविध मार्गांवर जादा 100 बस उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन मंडळाने दिवाळी सणाच्या काळात वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन विविध मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 3 नोव्हेंबर धनत्रयोदशीपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. याकरिता विविध शहरांकडे अतिरिक्त बस धावणार आहेत.
दिवाळी सणानिमित्त मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, गुरुवार दि. 4 रोजी नरक चतुर्दशी, 5 रोजी दीपावली पाडवा तर शनिवार दि. 6 रोजी भाऊबीज आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने या सलग सुटय़ांमुळे बाहेर पडणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून याकाळात दररोज 100 अतिरिक्त बस विविध मार्गांवर धावणार आहेत.
दि. 31 ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, पणजी, बेंगळूर, नाशिक, मंगळूर हैदराबाद आदी शहरांकडे अतिरिक्त बस धावणार आहेत. दिवाळीच्या सुटीसाठी मुंबई, पुणे, बेंगळूर-म्हैसूर, गोवा आदी ठिकाणांहून येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. वाढती संख्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने बसफेऱया वाढविल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी परिवहनने ऑनलाईन बुकिंग व्यवस्था केली आहे. प्रवाशांसाठी ksrtc.karnataka.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग सुरू आहे. तसेच बसस्थानकातही आगाऊ बुकिंगची व्यवस्था केली आहे.
परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर केएसआरटीसी मोबाईल ऍप विकसित केले आहे. ksrtc mobile app या नावाने प्ले स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड करून ऑनलाईन बुकिंग करता येते.