बेळगाव / प्रतिनिधी
राज्य परिवहन मंडळातर्फे दिव्यांगांना वर्षभर सवलतीच्या दरात देण्यात येणाऱया बसपास नूतनीकरणाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बसपासधारकांना दिलासा मिळाला आहे.
अंध, दिव्यांग क्यक्तींचा प्रवास सुकर व्हावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी परिवहनकडून विविध सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. या बसच्या नूतनीकरणाची मुदत वाढवून देण्यात आली असून संबंधित दिव्यांगांना 28 फेब्रवारीपर्यंत बसपास नूतनीकरण करून देण्यात येणार आहे. बेळगावसह चिकोडी, रायबाग, संकेश्वर, गोकाक या आगारातूनही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिव्यांगांच्या बसपासच्या नूतनीकरणाचे 26 डिसेंबरपासून काम सुरू होणार असून संबंधितांनी प्ttज्s/ sान्asग्ह्प्ल्.क्arहूक्a.gदन्.ग्ह या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधितांना एक वर्षासाठी हा पास दिला जातो. याआधारे ते दररोज 100 किलो मीटरपर्यंत प्रवास करू शकतात. 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सवलतीच्या दरात म्हणजे केवळ 660 रुपयांत वर्षभरासाठी हा बसपास नूतनीकरण करून दिला जातो.