नवी दिल्ली
जगातील दिग्गज स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी म्हणून ओळख असणारी ऍपल कंपनी नेहमीच नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी बाजारात आणण्यात अग्रस्थानी असल्याचे पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांच्या मदतीसाठी पॉवरफूल सॉफ्टवेअर फिचर्सचे डिझाइन केले आहे. ज्या दिव्यांग लोकांना चालणे, पाहणे, ऐकणे आणि मानसिक स्वरुपात काही समस्या आहेत अशांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या फिचर्सचा वापर सुलभपणे करता येणार आहे. ग्राहकांपर्यंत आपली वेगळी सेवा देण्यात कायम वरचढ असणारी ऍपल कंपनी या नव्या फिचर्सच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी उपयुक्त योगदान देणार आहे. चालू वर्षात ऍपलने आपल्या सर्व ऑपरेटिंग सिस्टममधील सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. नव नवीन फिचर्सची मांडणी केली आहे.