प्रतिनिधी / बेळगाव
नरकचतुर्दशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शिवप्रति÷ानतर्फे शनिवारी ‘दीपोत्सव’ चे आयोजन करण्यात आले होते. 1 हजार 500 हून अधिक दिव्यांनी शिवाजी उद्यानचा परिसर उजळून निघाला होता. ‘एक दिवा महाराजांसाठी’ हा उपक्रम दरवषी शिवप्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत आहे.
कोरोनामुळे सर्वत्र पसरलेले नैराश्य दूर होऊन प्रकाशरुपी चैतन्यमय वातावरण तयार व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी उद्यान येथे हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळीचा पहिला दिवा महाराजांसमोर लावून शिवभक्त दिवाळी साजरी करीत असतात. शनिवारी पहाटे दीपोत्सवासाठी शिवभक्त उपस्थित होते. पहाटेची गुलाबी थंडी व अभंगाचे स्वर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
नयनरम्य दिव्यांची आरास
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालण्यात आले. काकडआरती व प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. यावेळी दिवाळी व दीपोत्सवाचे महत्त्व सर्वांना सांगण्यात आले. शिवप्रति÷ानतर्फे मागील काही वर्षांपासून दीपोत्सवाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तो यावषीही राबविण्यात आला. बेनकनहळ्ळी येथील गोपाळ पाटील गुरुजी व त्यांच्या सहकाऱयांची भजनाची साथ मिळाली. शिवरायांच्या मूर्तीसमोर करण्यात आलेली आकर्षक आरास नयनरम्य ठरली. दीपोत्सवाचा फोटो काढण्याचा मोह शिवप्रेमींना आवरला नाही.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, चंद्रशेखर चौगुले, नामदेव पिसे, तुकाराम पिसे यांच्यासह शिवभक्त व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.