बेंगळूर/प्रतिनिधी
पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशार्वीच्या अटकेनंतर बेंगळूरच्या माउंट कार्मेल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी दिशाच्या समर्थनार्थ निवेदन प्रसिद्ध केले असून त्यांनीही तिच्या अटकेचा निषेध केला आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनावर आतापर्यंत ३३० जणांनी सह्या केल्या आहेत.
त्यांनी निवेदनात संकटाच्या या काळात आम्ही तिच्या, तिच्या कुटुंबाला बिनशर्त पाठिंबा दर्शवितो आणि तिचा आम्हाला अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.
माउंट कार्मेल कॉलेजमधून पदवी प्राप्त करणारी दिशा बेंगळूरमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘टूलकिट’ विरोधात तिला अटक करण्यात आली होती.