बेंगळूर/प्रतिनिधी
दिशा रवी अटकेच्या वेळी स्थानिक पोलिस उपस्थित नसल्याचा दावा दिशाच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
दिशा रवीच्या घराशेजारी राहणाऱ्या चिक्काबनावरा येथील काही रहिवाशांनी असा आरोप केला आहे की, शनिवारी दुपारी २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्त्या दिशाला दिल्ली पोलिसांनी बेंगळूर येथून अटक केली तेव्हा त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस नव्हते. तसेच योग्य कार्यवाही केली जात नव्हती. परंतु स्थानिक पोलिसांनी या दाव्यांचा खंडन केलं आहे.
माध्यमांशी बोलताना दिशांच्या एका शेजाऱ्याने शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन महिलांसह चार जण नियमित वाहनातून दिशाच्या घरी आले. दुपारी तीनच्या सुमारास आम्ही त्यांना टॅक्सीमध्ये दिशाला घेऊन जाताना पाहिले. ते म्हणाले की ते दिल्ली पोलीस होते. तसेच त्यांच्याबरोबर स्थानिक पोलीस कर्मचारी नव्हते.
त्यांनी दिल्ली पोलिसांना दिशाचा लॅपटॉप व मोबाइल फोनही पॅक करुन घेऊन जाताना पाहिले. त्याने असा दावा केला की दिशाच्या आई-वडिलांना अटकेचे कारण योग्यरित्या सांगितले गेले नाही.
जो कोणी दिशाला पकडण्यासाठी आले होते ते सर्वजण कॅजुअल ड्रेसमध्ये होते. आम्ही स्थानिक सोळादेवनाहळ्ळी पोलीस कर्मचार्यांना ओळखतो आणि त्यांना ओळखू शकतो. पण जे पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी आले ते स्थानिक लोक नव्हते. दिशा आणि तिचे कुटुंब गेल्या तीन ते चार वर्षांपासून या भागात राहत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.