प्रतिनिधी/ बेळगाव
द इंडियन अचिव्हर्स क्लबतर्फे दिशा संघवी यांना ‘द इंडियन अचिव्हर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिशा या आहारतज्ञ जीवनशैली प्रशिक्षक आणि क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून काम पाहतात. इंडियन अचिव्हर क्लबने गतवषी 35 वयाखालील 35 जणांची इंडियन अचिव्हरसाठी निवड केली. त्यामध्ये दिशा संघवी यांचा समावेश आहे.
मूळचे बेळगावचे व सध्या मुंबई येथे असणारे उद्योजक व एम्प्री मेडिकामेंटचे संचालक अमृत खोडा यांच्या दिशा या कन्या असून बेळगावचे राजू खोडा यांच्या त्या चुलत बहीण आहेत. इंडियन अचिव्हर्स क्लब हा 66 वर्षांपासून कार्यरत असून विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱया व्यक्तींना क्लबतर्फे गौरविण्यात येते. दिशा संघवी या साधे खाणे आणि आरोग्य पूर्ण जगणे या सूत्रावर आधारित उपचार करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. क्लबचे अध्यक्ष हर्ष वैद्य यांनी दिशा यांचे अभिनंदन केले आहे.