प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील निवळी येथे मृत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी लाच स्वीकारणाऱया तलाठय़ाला रंगेहाथ अटक करण्यात आल़ी रत्नागिरी लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आल़ी राजेश इंदल गुसिंगे असे अटक करण्यात आलेल्या तलाठय़ाचे नाव आह़े त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवळी येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने मृत आईचे नाव सातबारावरून कमी करण्यासाठी निवळी तलाठी यांच्याकडे अर्ज केला होत़ा तलाठी गुसिंगे यांनी नाव कमी करण्यास चालढकल करण्यास सुरूवात केल़ी याबद्दल तक्रारदार यांनी तलाठी यांना विचारणा केल़ी यावेळी तलाठी गुसिंगे याने आईचे नाव कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 2 हजार रूपयांची मागणी केल़ी गुसिंगे हा लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी लाचलुचतप विभागाकडे तक्रार नेंदवल़ी त्यानुसार गुसिंगे याला रंगेहाथ अटक करण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून सापळा रचण्यात आल़ा यासाठी लाचलुचपत विभागाने तक्रारदारांना पैसे देण्याचे कबुल करण्यास सांगितल़े त्यानुसार तक्रारदार यांनी गुसिंगे याच्याजवळ तडजोड करून 1 हजार 500 रूपये देण्याचे मान्य केल़े सोमवारी निवळी तलाठी कार्यालय येथे येवून पैसे देणार असल्याचे तक्रारदार यांनी गुसिंगे याला सांगितल़े
सोमवारी लाचलुचपत विभागाचे कर्मचारी हे निवळी तलाठी कार्यालय येथे सापळा रचून तयार होत़े सायंकाळी तक्रारदार हे तलाठी कार्यालयात दाखल झाल़े यावेळी तक्रारदार यांनी 1 हजार 500 रूपये तलाठी यांच्याकडे दिल़े यावेळी सापळा रचून तयारीत असलेल्या लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱयांनी तलाठी गुसिंगे याला रंगेहाथ अटक केल़ी तसेच त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेडकॉन्स्टेबल विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर, पोलीस शिपाई गावकर यांनी केल़ी