तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साधला निशाणा
नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचा ‘दीदी ओ दीदी’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या या वक्तव्यावर काहींनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा आता पश्चिम बंगलमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
काकोली घोष यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, दीदी ओ दीदी म्हणणारे दादा कुठे गेले?..असा प्रश्नच त्यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी #Resign PM Modi हा हॅशटॅग देत तर दुसरा हॅशटॅग #दादागीरी नहीं चलेगा यार म्हणजे दादागिरी चालणार नाही असे म्हटले आहे. यासोबतच काकोली यांनी हिंदी भाषेत बंगालचे नाव देखील लिहिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून राज्यातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्राप्त केलेल्या यशाबद्दल ममता बॅनर्जी यांच्यासाठी खास ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.