वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीआयसीआय बँक आणि व्हीडिओकॉन मनी लॉड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले दीपक कोचर यांना न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत इडीची कोठडी दिली आहे. पीएमपीएलनुसार यांची चौकशी करण्यात येणार आहे.
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमपीएलअंतर्गत दीपक कोचर यांना विविध कलमाखाली अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये याप्रकरणी तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अधिक चौकशीसाठी सोमवारी कोचर यांना अटक केली आहे. मंगळवारी त्यांना पीएमपीएल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आयसीआयसीआयने व्हीडिओकॉन उद्योग समुहाला 1875 कोटी रुपये कर्ज दिले होते. तथापि त्यातील अनियमितता आणि मनी लॉड्रिंगचा मुद्दा उपस्थित झाल्याने याप्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांच्या मालकी हक्कातील कंपन्यांची चौकशी केल्यानंतर 78 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.