प्रतिनिधी /वास्को
कदंब वाहतुक महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक यांची सरकारने महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माजी आमदार व कदंब वाहतुक महामंडळाचे माजी अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर महामंडळाचे हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी उपाध्यक्ष दीपक नाईक यांची वर्णी लागली आहे.
दीपक नाईक हे मुरगावचे माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक व वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष आहेत. बरीच वर्षे ते कदंब वाहतुक महामंडळाचे संचालक होते.