स्पर्धेतील जर्सी, आकर्षक चषकांचे थाटात अनावरण, 6 संघांचा सहभाग
बेळगाव : दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेन्टस् फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेतील जेत्यांना प्रदान केल्या जाणाऱया आकर्षक चषकांचे व स्पर्धेसाठी खास तयार केल्या गेलेल्या जर्सीचे बुधवारी छोटेखानी सोहळय़ात उत्साहात अनावरण केले गेले. मुख्य पुरस्कर्ते दीपक नार्वेकर यांनी सोहळय़ाचे अध्यक्षस्थान भूषवले.
प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्य पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, शिवा अंगडी, मोहन परब, स्वप्नील भडाले, सुरेश कबाडी, संघमालक गजानन फगरे (साईराज वॉरियर्स), चंदन कुंदरनाड (विश्रृत स्ट्रायकर्स), राजू कबाडी (मिलन वॉरियर्स), महेश काकतीकर (गणेश ज्वेलर्स, हुबळी टायगर्स), जीवन वेर्णेकर (दैवज्ञ स्पोर्टस् क्लब), शांतनू मानवी, आनंद करडी (चॅलेंजर्स आनंद अकादमी) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी, पाहुण्यांचे स्वागत कमिटीचे अध्यक्ष विक्रम देसाई, उपाध्यक्ष नागेश देसाई, सचिव परशराम पाटील, सहसचिव जयसिंह रजपूत, खजिनदार नासीर सनदी यांच्याहस्ते पाहुण्यांचे व सर्व संघमालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीपक नार्वेकर यांनी गणेशपूजन केले. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या 6 संघांच्या जर्सीचे व स्पर्धेतील विजेत्यांसाठी असलेल्या आकर्षक चषकांचे अनावरण केले गेले. दीपक नार्वेकर, चंदन कुंदरनाड, आनंद करडी यांनी आपले विचार मांडले. विक्रम देसाई यांनी स्पर्धेचा उद्देश अधोरेखित केला. नागेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर जयसिंह रजपूत यांनी आभार मानले.