बेळगाव
शहरातील युनियन जिमखाना मैदानावर दि. 10 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया बोर्ड ऑफ पॅरेन्टस् फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटप्रेमी व उद्योजक दीपक नार्वेकर हे मुख्य पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत.
बीपीसीचे खजिनदार नासीर सनदी यांच्या हस्ते दीपक नार्वेकर व गजानन भांदुर्गे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी परशराम पाटील, विक्रम देसाई, नागेश देसाई, जयसिंग रजपूत, नरेंद्र गोधवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूण 3 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून प्रारंभी 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेने सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक वयोगटात सहा संघांचा समावेश आहे.