बेळगाव/ प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी लीग 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. 6 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. युनियन जिमखाना मैदानावर या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 14 वर्षाखालील गटात 6 संघांनी भाग घेतला आहे.
ए.जे. स्पोर्ट्स, गोकाक ग्लॅडीटर, एक्ससेस इलाईट हुबळी, सीसीआय ब्लु, आनंद अकादमी, ड्रॉपीन वॉरियर्स व साई वॉरियर्स या संघा दरम्यान होणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी ए.जे. स्पोर्ट्स वि. गोकाक ग्लॅडिटर यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे सहा संघातून एक मुलगी संघात खेळणार आहे. कारण महिला क्रिकेटस प्राधान्य देण्यासाठी संघटनेचे हे उपक्रम राबविले आहे. 13 साखळी साने तर 2 उपांत्य व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.