सैन्यदलातील जवानाच्या हस्ते शस्त्रपूजन
प्रतिनिधी / सातारा
दीपावली सणाचे औचित्य साधून साताऱ्यातील शिवभक्तांनी किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गपूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गपूजनानिमित्ताने झेंडूच्या फुलांची तोरणे गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावण्यात आली. रांगोळय़ाच्या पायघड्य़ा काढण्यात आल्या होत्या. भारतीय सैन्य दलातील जवान श्रीधर नलावडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. वातावरण शिवमय असे झाले होते.
दिपावलीनिमित्ताने साताऱ्यातील शिवभक्तांनी दुर्गपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास शिवभक्तांनी गडाच्या मुख्य प्रवेशद्वारास झेंडूच्या फुलांची तोरणे लावण्यात आली होती. रांगोळ्य़ा काढण्यात आल्या होत्या. भारतीय सैन्य दलातील जवान श्रीधर नलावडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवव्याख्याते मिथून माने यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर शिवकार्य करणारे स्व. निवृत्तीकाका पाटील यांचा श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवभक्तांनी प्रयत्न केले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवप्रेरणा मंत्रांनी वातावरण शिवमय असे भारुन टाकण्यात आले होते. आभार व स्वागत सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळी अजिंक्यताऱ्यावर दीपोत्सव
किल्ले अजिंक्यताऱयावर साताऱयातील शिवभक्तांच्यावतीने शुक्रवार दि. 5 रोजी सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गड हजारो दीप प्रज्वलित करुन उजळून टाकण्यात येणार आहे, असे शिवभक्तांनी यावेळी जाहीर केले.