ऑनलाईन टीम / टोकियो :
भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कोरियाच्या सान आनने उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला 6-0 ने पराभूत केले. सान आनने पहिला सेट 30-27 असा जिंकला. त्यानंतर दीपिकाने दुसरा आणि तिसरा सेटही 24-26 असा गमावला. त्यामुळे तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.