25 जानेवारीला ओटीटीवर होणार प्रदर्शित
दीपिका पदूकोन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट 25 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दीपिकाने चित्रपटाचा टीजर शेअर करत ‘मेरे दिल का एक तुकडा’ असे नमूद केले आहे. तर सिद्धांतने ‘ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करतात, त्यात तुम्ही स्वतःचा अंश सोडता’ असे म्हटले आहे. या रोमँटिक नोयर ड्रामा चित्रपटात दीपिका-सिद्धांत यांच्यासह अनन्या पांडे, धैर्य करवा, रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
गहराइयां हा एक नात्यांमधील नाटय़ दर्शविणारा चित्रपट असून यात कॉम्प्लेक्स मॉडर्न रिलेशनशिप्समधील खोली, प्रौढत्व, लेटिंग गो आणि कुणाच्या तरी ‘जीवनमार्गा’वर नियंत्रण करणे इत्यादी प्रकारे दर्शविण्यात आले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जौहरकडून करण्यात आली आहे.