ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री दीपिका पादूकोणने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिने सोशल मीडियावरून सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरून सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलीट केले आहेत. तिने हा टोकाचा पाऊल का उचलला याची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत आहे.
दरम्यान, दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंह सध्या राजस्थानमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट करत आहेत. सोशल मीडियावर दीपिकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. इंस्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
तर दुसरीकडे फेसबुक आणि ट्विटरवर तिचे फॉलोअर्स अधिक आहेत. पण मग दीपिकाने अचानक पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न आहे.