ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे. ड्रग्ज ग्रुपची ॲडमिन मीच आहे. तसेच ड्रग्जसंदर्भात मीच चॅट केले होते, अशी कबुली दीपिकाने एनसीबी समोर केली आहे. मात्र, मी ड्रग्जचे सेवन केलेले नाही असेही दीपिकाने सांगितले आहे.
तसेेेच ‘माल’ या शब्दाचा अर्थ ड्रग्ज नाही, अशी माहिती दीपिकाने एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे. दरम्यान, सकाळी 10.30 वाजल्यापासून एनसीबीकडून दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे.
‘पवना लेक’ पार्टीत ड्रग्जचे सेवन : श्रद्धा कपूर
छिछोरे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ‘पवना लेक’ येथे झालेल्या पार्टीत ड्रग्ज आणि अल्कोहोल होते. पण ड्रग्जचे सेवन मी केलेले नाही अशी माहिती श्रद्धा कपूरने एनसीबी चौकशीमध्ये दिली आहे.
सुशांत ड्रग्ज घ्यायचा : सारा खान
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा. मात्र, मी कधीच ड्रग्जचे सेवन केलेले नाही असे सारा अली खानने एनसीबी चौकशी दरम्यान सांगितले आहे. तसेच आम्ही दोघे रिलेशशिपमध्ये होतो असेही तिने यावेळी सांगितले.
दरम्यान, अजूनही एनसीबीकडून चौकशी सुरु आहे.