प्रतिनिधी /बेळगाव
खास बेळगावकर खाद्य प्रेमींसाठी ‘दी गँरेज कॅफे’ विनायकनगर येथे थाई फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात ‘दी गँरेज कॅफे’ हे विविध प्रकारचे फूड फेस्टिवल आयोजित करण्यात प्रख्यात आहे. खास आयोजित थाई फूड फेस्टिवल मध्ये 48 विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. थाई करी व जॅस्मिन राईस, एक्सॉटिक थाई स्पेशल, डिमसम व विविध प्रकारची सुप्स, स्टार्टर्स व मेन कोर्स डिशेस चा स्वाद बेळगावकर खवय्यांना चाखण्यास मिळणार आहे.
दररोज दुपारी 12 ते रात्री 10 वा. पर्यंत थाई फूड फेस्टिवल असणार आहे. बेळगांव परिसर व आजुबाजुंच्या भागातील खाद्य प्रेमींनी थाई फूड फेस्टिवलचा सुमधुर संगीताच्या तालावर आपल्या कुटुंबीया समवेत आस्वाद व आनंद घेतला आहे. ऍडव्हान्स बुकींग साठी मोबाईल क्रमांक 938008075 वर संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. थाई फूड फेस्टिवलचे आयोजन दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत करण्यात आले आहे.