लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा सीमर मार्क वूड भारताविरुद्ध पुढील आठवडय़ात होणाऱया तिसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. मार्क वूडला दुसऱया कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळात खांद्याची दुखापत झाली होती. यापूर्वीच काही मातब्बर खेळाडूंची उणीव जाणवत असलेल्या यजमान इंग्लिश संघाला दुसऱया कसोटीत 151 धावांनी लाजिरवाणी हार पत्करावी लागली. स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर व ख्रिस वोक्स हे दुखापतीमुळे तर बेन स्टोक्सने माघार घेतली असल्याने इंग्लंडला या खेळाडूंची प्रामुख्याने उणीव जाणवत आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दि. 25 पासून खेळवली जाणार आहे.