प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगत असलेल्या ज़े के फाईल्स येथे दुचाकीस्वाराने कारला जोरदार धडक दिल़ी ही घटना बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडल़ी या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
अभिजित सुनील पिलणकर (37, ऱा कुवारबाव, रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे बुधवारी सायंकाळी मोटारसायकल (एमएच 08 एजे 8683) घेवून गद्रे कंपनी ते ज़े के फाईल्स असा जात होत़े ज़े के. फाईल्स येथील विजय फर्निचरसमोरील रस्त्यावर डाव्या बाजूला उभी असलेली कार (एमएच 08 झेड 6620) हिला जोरदार धडक दिल़ी या अपघातात दुचाकीस्वार अभिजित हे जखमी झाल़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दुचाकीस्वार अभिजित याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े