प्रतिनिधी/ कराड
आईसोबत रस्ता ओलांडत असताना दुचाकीच्या धडकेत 6 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात कराड-ढेबेवाडी रोडवर चचेगाव ता. कराड गावच्या हद्दीत शुक्रवार, दि. 21 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाला. समर्थ संतोष शेळके रा. चचेगाव असे जखमी मुलाचे नाव आहे.
याबाबत समर्थची आई अर्चना संतोष शेळके वय 28 रा. चचेगाव यांनी कराड ग्रामीण पोलिसांत खबर दिली आहे. शुक्रवार दि. 21 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चचेगाव येथील गौरव किराणा दुकानासमोर आई अर्चना यांच्यासोबत समर्थ रस्ता ओलांडत होता. यावेळी ढेबेवाडीकडून आलेल्या दुचाकीची समर्थला धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वार शेखर संगाप्पा यलगुरी रा. रैनाक वस्ती, आगाशिवनगर या संशयीतावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु करण्यात आला आहे.