प्रतिनिधी/ बेळगाव
आदर्शनगर, वडगाव येथे सोमवारी रात्री एका दुचाकीमध्ये दिवड जातीचा साप आढळला. सर्पमित्र गणेश दड्डीकर यांनी एका मेकॅनिकच्या साहाय्याने त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
दिवड जातीचा बिनविषारी साप आदर्शनगर वडगाव येथील एका घराच्या पॅसेजमध्ये आढळला. येणाऱया-जाणाऱया नागरिकांची चाहूल लागताच शेजारी असणाऱया डीओ दुचाकीमध्ये तो शिरून बसला. हा साप बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र गणेश दड्डीकर यांना बोलावण्यात आले. त्यांनी आपले मित्र नागेश टुमरी यांच्या साहाय्याने समोरचे डूम खोलून तो साप बाहेर काढला. मंगळवारी त्याला नैसर्गित अधिवासात सोडण्यात आले.