कुर्डुवाडी प्रतिनिधी
दुचाकीवरील आजोबा व नातवास कारने पाठीमागून धडक दिल्याने आजोबांचा मृत्यू तर नातू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि.२५ रोजी शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पंढरपूर रस्त्यालगत घडली.
कारचालक अपघातानंतर गाडी तिथेच सोडून पळून गेला. प्रभाकर पाटील (वय ८५) रा. भोसरे असे मयताचे नाव असून नातू रविराज महादेव चव्हाण (वय २७ ) रा. भोसरे हे जखमी झाले आहेत. रविराज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात कारचालका विरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व आजोबा हे सकाळी सव्वादहाच्या सुमारास दुचाकीवरून पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या वाशिंग सेंटर येथे आले होते. त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन येणाऱ्या कार क्रमांक एम एच १३ डी एम ६१ वरील चालकाने भरधाव वेगात येऊन धडक दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले व आजोबा गंभीर जखमी होऊन मयत झाले. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.