प्रतिनिधी / सातारा :
सिव्हिल हॉस्पीटल ते सदरबझार रोडवरील समाजकल्याण ऑफिससमोर बेशुद्ध पडल्याचे सोंग घेऊन मदतीला धावणाऱ्या दुचाकीस्वारास चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात सातारा शहरच्या डीबी पथकाला यश आले आहे.
याबाबत पोलीस दिलेली अधिक माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम व पथकाला संशयिताची माहिती मिळाली. या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत संशयित संजय एकनाथ माने(वय 40 रा. सदरबझार), फरीद चॉद शेख(वय 26 रा. सदरबझार) यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला एक मोबाईल हॅन्डसेट, तीन पेनड्राइव्ह असा एकूण 8 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करत आहेत.