सातारा / प्रतिनिधी :
भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने ट्रकला जोरदार धडक दिली. यात रोहित संतोष ननावरे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सम्राट पेट्रोलपंपाच्या गेटलगत हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा- रहिमतपूर मार्गावर सम्राट पेटोल पंप आहे. दि. 24 रोजी 3 वाजण्याच्या सुमारास या पंपावरून ट्रक (एम.एच.06.ए.क्यू.6669) डिझेल भरून पंपातून बाहेर पडत होता. यावेळी रोहित ननावरे हा भरधाव वेगातील दुचाकीसह ट्रकच्या डिझेलच्या टाकीला धडकला. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यापाठीमागे बसलेला प्रज्वल गजानन पवार हा जखमी झाला आहे. ट्रक चालकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.