प्रतिनिधी/ वडूज
म्हसवड-माळशिरस रस्त्यावर गोरडवाडी नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोनजण जागेवरच ठार झाले. तर या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये खटाव तालुक्यातील कणसेवाडी येथील फिरोजशेखअली खोत (वय 23) तर माण तालुक्यातील धामणी येथील आबासाहेब खाडे (वय 24) या दोन युवकांचा समावेश आहे. तर शामराव खाडे, धनाजी खाडे, दीपक खाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकलुज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, मयत आबा गुलाब खाडे व त्यांचा नातेवाईक शामराव खाडे हे दोघे मोटार सायकलीवरुन धामणीहुन मेडद येथे नातेवाईकाकडे निघाले होते. तर समोरच्या बाजूकडून मयत फिरोजशेखअली खोत, धनाजी खाडे, दिपक खाडे हे तीघेजण कणसेवाडी गावाककडे यायला निघाले होते. गोरडवाडी येथे या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यु झाला. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.