प्रतिनिधी /मडगाव
पर्यटक म्हणून गोव्यात येऊन दुचाकी चोरणाऱया गुजरात राज्यातील एका आरोपीला कोलवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजीव मोहनराव अंजुरकर (35) असे असून हा आरोपी वडोदरा -गुजरात येथे राहणारा आहे. त्याच्याकडून 69 हजार रुपये किंमतीची चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार पेड -सेरावली येथील कौन्ससाव दा सिल्वा यांची जीए-08-एके-9431 क्रमांकाची स्कुटर कोलवा येथून 6 सप्टेंबर 2021 रोजी चोरीस गेली. ही स्कुटर वरील आरोपीकडे सापडली. आरोपी चोरीची ही दुचाकी घेऊन फिरत होता. आरोपीकडून चोरीची स्कुटर जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबय गावकर, पोलीस शिपाई अक्षय वारीक, संजय गावकर व विकास कौशीक यांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक केली.