चालू आर्थिक वर्षात 11 ते 13 टक्क्मयांनी विक्री घसरणार : इक्राच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आज जगातील 200 हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. आणा यांचा सर्वाधिक फटका उद्योगधंदे व व्यापारी वर्गाला बसत असून लाखो लोकांच्यावर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव सध्या भारतामध्येही दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये दुचाकी वाहनांची विक्री 11.13 टक्क्मयांनी घटण्याचे अनुमान आहे. हे अनुमान इक्राच्या अहवालातून मांडले आहे. वाहन क्षेत्राच्या समस्या वाढण्याचे संकेतही व्यक्त केले आहेत.
कोरोनाचा प्रभाव शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील बाजारापेठावर मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने लोकांच्याकडे खर्च करण्यासाठी आर्थिक चणचण निर्माण होण्याची भीती असल्यामुळे ग्राहकांची वाहन खरेदीवर नकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे मागणीत घट नोंदवण्यात येणार आहे. कोरोनामुळे लॉकडाउनची करण्यात आलेली घोषणा आणि त्यातच बीएस6 उत्सर्जन प्रणालीचे सादरीकरण देशात लागू करण्यात येणार आहे. यामुळे वाहनांच्या किमती पहिल्यापेक्षा 10 ते 12 टक्क्यांनी वधारण्याचे संकेत आहेत. यामुळे दुचाकी वाहन विक्री प्रभावीत होण्याचे भाकीत आहे.
उपकरण निर्मितीचा लाभ घटणार
वर्षाच्या आधारावर दुचाकी वाहनांच्या उपकरणाची निर्मितीचा फायदा 11.5 ते12 टक्क्मयांपर्यंत घटण्याचे अनुमान आहे. तर हा टक्का मागील वर्षात 14 टक्क्मयांवर राहिल्याचे इक्राचे उपाध्यक्ष शमशेर दीवान यांनी सांगितले आहे.