पोलीस वन विभागाची अथणी तालुक्मयात कारवाई, एक जण फरारी
प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस वन विभागाने कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. रविवारी अथणी तालुक्मयातील चंद्राप्पावाडीजवळ दुतोंडी साप व कासव विकणाऱया एका वृद्धाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार फरारी झाला आहे. साप व कासवांची महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी तस्करी करण्यात येत होती.
रमेश शंकर निकम (वय 60) रा. चंद्राप्पावाडी, पोस्ट आजूर, ता. अथणी असे अटक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्याचा आणखी एक साथीदार भाऊ मनोहर निकम रा. चंद्राप्पावाडी हा फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या वृद्धाला अथणी येथील जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
पोलीस वनविभागाच्या उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार एस. आर. अरिबेंची, के. डी. हिरेमठ, जीपचालक बी. बी. इंगळगी आदींनी ही कारवाई केली आहे. अटक केलेला वृद्ध रमेश व त्याचा साथीदार भाऊ या दोघांवर कलम 9, 39, 44, 51, वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.