अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जुलै, बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील
सांगली / प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सांगली (ग्रामीण) प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची दुधगाव,नांद्रे व बिसूर गावातील रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक स्त्री उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ९ जुलै २०२१ पर्यंत आहे. अशी माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली.
रिक्त पद असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव कंसात अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक व रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे
दुधगाव (७२ वाडकर वस्ती) सेविका १ पद, दुधगाव (६६ जून्या टेलीफोन ऑफिसजवळ) सेविका १ पद, नांद्रे (१४५-नागाई मंदिर) सेविका १ पद, नांद्रे (१५०-बौध्द वसाहत) सेविका १ पद, नांद्रे (१५४ जूनी तालीम) मदतनीस १ पद, बिसूर (९८-जिल्हा परिषद शाळेजवळ) सेविका १ पद.
या पदासाठी गावातील स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक स्त्री उमदेवारांनी अर्ज करावेत. उमेदवारांचे वय दिनांक २४ जून २०२१ रोजी २१ वर्षावरील व ३२ वर्षाच्या आतील असावे. किमान १० वी पास व मदतनीस पदासाठी किमान ७ वी पास शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ९ जुलै २०२१ रोजीचे सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सांगली, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सांगली येथे सांक्षांकित प्रतिसह सादर करावेत, असे आवाहन श्रीमती वर्षा पाटील यांनी केले आहे.