प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सातलींग उर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी यांच्या राहत्या घरातील खोलीमध्ये मन्ना नावाचा जुगार खेळत असताना अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकांनी छापा टाकल्याने ११ जुगारी, रोख रक्कम असा ४ लाख २१ हजार ७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये नागप्पा दत्तप्पा व्हडारी रा. मुगळी, इष्टलिंगप्पा श्रीशैल अमाणे, नामदेव पांडू राठोड, सय्यद हब्बूसो बळूरगी, हुसेन दस्तगिर नदाफ सर्व राहणार दुधनी, चंद्रकांत मलकण्णा दिंडोरे रा चलगेरा ता. आळंद, गुरुराज भीमराव उडगी रा. मैंदर्गी, परमेश्वर सिद्धाप्पा धोत्रे, राजीव गोविंद राठोड, पुरु हरिश्चंद्र राठोड तिघे दुधनी, सातलींग उर्फ अप्पू सैदप्पा परमशेट्टी हे सर्व जुगारी एका खोलीमध्ये पैशावर पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना रोख रुपये ६७ हजार ७० रु व तसेच पत्त्यांचे डाव, मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य असे एकूण रुपये ६४ हजार, व २ लाख ९० हजार किंमतीचे सहा मोटर सायकल असे एकूण ४ लाख २१ हजार ७० रुपये पोलिसांनी जप्त केले असून सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद नबीलाल मियावाले यांनी दिली असून पुढील तपास अजय भोसले करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, अजय भोसले, अल्ताफ शेख, नबीलाल मियाँवाले, अजय शिंदे यांनी केली.