क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर गैरव्यवहारातही किरणची दलाली : घोटाळय़ाचीही चौकशी गृहखात्याने सीआयडीकडे सोपविली
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच शेजारच्या बागलकोट जिल्हय़ात घडलेल्या दूध पावडर घोटाळय़ाचीही चौकशी गृहखात्याने सीआयडीकडे सोपविली आहे. सोने चोरी प्रकरणातील सोनेरी टोळीच या ही प्रकरणात सक्रिय असून क्षीरभाग्य या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत अंगणवाडी बालकांना वाटल्या जाणाऱया दूध पावडरची खुल्या बाजारात विक्री करणाऱया गुन्हेगारांशी हातमिळवणी करून या टोळीने मोठय़ा प्रमाणात माया जमविल्याचे सामोरे आले आहे.
मंगळवारी सायंकाळी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात होणार आहे. सध्या यमकनमर्डी (जि. बेळगाव) पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी कार अडवून कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरून त्याची विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांच्यासह चार पोलीस अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
या स्फोटक प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू असतानाच शेजारच्या बागलकोट जिल्हय़ातील तितक्मयाच खळबळजनक आणखी एका प्रकरणाचीही चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही पोलीस अधिकाऱयांचे धाबे दणाणले असून सोने चोरी प्रकरणातील दलाल किरण वीरनगौडर यानेच या प्रकरणातही महत्त्वाची भूमिका वठविल्याची माहिती मिळाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार क्षीरभाग्य योजनेंतर्गत अंगणवाडीतील मुलांना दूध पावडर वाटली जाते. मात्र, काही दलाल सरकारी योजनेंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या दूध पावडरची खुल्या बाजारात विक्री करतात. यासंबंधीची माहिती मिळताच बागलकोटचे जिल्हा पोलीसप्रमुख लोकेशकुमार जगलासर यांनी या टोळीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
असा रचला सापळा
20 ऑक्टोबर 2020 रोजी जमखंडी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 टन दूध पावडर जप्त केली जाते. लहान मुलांच्या पोषणासाठी दिल्या जाणाऱया दूध पावडरची खुल्या बाजारात विक्री करून सरकारच्या हेतूला सुरुंग लावणाऱया गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यासाठी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा निर्णय बागलकोट पोलीस घेतात. पोलीस उपअधीक्षक व अशा अनेक प्रकरणांचा यशस्वीरीत्या तपास करणारे रविंद्र शिरूर यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली जाते. सुरुवातीला तिघा जणांवर एफआयआर दाखल केला जातो. चौकशीअंती काही वाहतूकदार व सरकारी अधिकाऱयांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येते. महालिंगपूर येथील शिवानंद अंगडी या वाहतूकदाराचे नाव ठळक चर्चेत येते. चौकशी तीव्र होताच या टोळीतील म्होरके कारवाई टाळण्यासाठी किरण वीरनगौडरची मदत घेतात. पोलीस दलातील आपले वजन वापरून कारवाई थांबविण्यासाठी किरण प्रयत्न करतो. त्यासाठी मोठा सौदाही होतो. यशस्वी सौद्यानंतर तपासात शिथिलता आणण्यासाठी वरि÷ पोलीस अधिकारी या प्रकरणाची चौकशी बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्याकडे सोपवितात.
अद्याप एफआयआर का नाही?
सोने चोरी प्रकरणाचा प्राथमिक तपास सीआयडीने पूर्ण केला असला तरी संबंधितांविरुद्ध अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. एफआयआर दाखल करण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ आयजीपींसह चार पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या करून या गंभीर प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तर करण्यात येत नाही ना? अशी शंका जनसामान्यांमधून बोलून दाखविली जात आहे.
वाळूमाफियांची मदत
दूध पावडर प्रकरणात अडकलेल्या आरोपींनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी बदामी येथील वाळूमाफियांची मदत घेतली आहे. या माफियांच्या मदतीनेच वरिष्ट पोलीस अधिकाऱयांपर्यंत पोहोचून दलालामार्फत व्यवहार ठरविण्यात आला आहे. या सोनेरी टोळीने बेळगाव जिल्हय़ातही अन्नभाग्य योजनेतील तांदूळ, क्षीरभाग्य योजनेतील दूध पावडर हडप करून मोठय़ा प्रमाणात कमाई केली आहे. जर सीआयडीने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केली तर दलालांबरोबरच पोलीस अधिकाऱयांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
मात्र, अमरनाथ रेड्डी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रामाणिकपणे तपास हाती घेऊन बालकल्याण खात्याच्या अधिकाऱयांसह आणखी कोणाचा सहभाग काय आहे? हे खणून काढण्यास सुरुवात करतात.
चौकशी जोर धरताच सौदेबाजांचे धाबे दणाणतात. यातच बेळगाव येथील 4 किलो 900 ग्रॅम सोने विक्री प्रकरण उघडकीस येते. या प्रकरणात सहभागी झालेले वरिष्ट पोलीस अधिकारी व दलाल यांनी आपली करामत दाखवून दूध पावडर प्रकरणातही मोठय़ा प्रमाणात माया गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस येताच हे प्रकरणही सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही पोलीस अधिकाऱयांच्या अडचणी वाढल्या आहेत.