पलूस / प्रतिनिधी :
पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील वसंत नगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यावरून व पूर्ववैमनस्यातून तिघांचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला. हा प्रकार रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते हे मयत झाले असून लखन मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकाराने दुधोंडी पलूस परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर कुंडल पोलीस स्टेशन अधिकारी पोहोचले आहेत. घटनास्थळावर या घटनेनंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.