दुबई
कोरोना महामारीच्या कारणास्तव दुबईमध्ये तयार होत असणाऱया हिंदू मंदिराची दारे ही आगामी वर्षातील दिवाळीला भक्तांसाठी खुली होणार असल्याचे संकेत आहेत. या अगोदर नियोजित करण्यात आलेल्या कालावधीत ही मंदिरे सुरु होणार असल्याची माहिती आहे. युएईमध्ये जवळपास 30 लाख भारतीयांचे वास्तव्य असल्याने या ठिकाणी हिंदूंसाठी नवीन श्रद्धास्थान निर्माण होणार असल्याचे म्हटले जात आहे. वर्ष 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी मंदिर उभारणीसाठी जमीन देणार असल्याचे वचन दिले होते. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नंतरच्या काही वर्षांमध्ये मंदिर उभारणीस प्रारंभही करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही देशातील सांस्कृतिक देवाण-घेवाणीसोबत नातेसंबंध मजबूत होण्यास बळ मिळणार असल्याचा विश्वासही या दरम्यान व्यक्त केला जात आहे. परंतु प्रत्यक्ष मंदिरात जाऊन भक्ती करण्यास मात्र अजून विलंब लागणार असल्याचे संकेत सध्यातरी दिसून येत आहेत.