प्रतिनिधी / म्हापसा
दुबई येथे अडकलेल्या गोमंतकीयांना बस्तोडöम्हापसा येथील नागरिक तथा लाईफ करिअर एनएलपी या कंपनीच्या एचआर विशांती कवठणकर यांनी मदतीचा हात पुढे केल्यावर गोव्याचे खासदार तथा एनआरईआयसी आयुक्त नरेंद्र सावईकर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जनरल काऊंसिल दुबईचे विपूल यांच्या सहकार्याने फेस 2-3 च्या वंदे भारत मिशन योजनेंतर्गत दुसरे व तिसरे विमान 24 रोजी गोव्यात येणार आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत अडकून पडलेल्या गोमंतकीयांना 24 जून रोजी खास विमानातून राज्यात परत आणण्यात येईल असे खास पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
दुबईहून गोव्यात येण्यास दुबई येथे सहकार्य करणाऱया खासदार तथा एनआयआरचे आयुक्त नरेंद्र सावईकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जनरल काऊंसिल दुबईचे विपूल यांचे विशांती कवठणकर यांनी आभार मानले असून त्यांच्या सहकार्याने दुबईत अडकून पडलेल्या गोमंतकीयांना आता आपल्या गावी यायला मिळेल असे म्हटले आहे. वंदे भारत मिशनच्या योजनेंतर्गत युएई हून 24 जूनला खास तिसऱया विमानाने गोव्यात पाठविण्यात येणार आहे. एकूण 2 विमानाने 298 प्रवाशांना घेऊन गोव्यात येणार आहेत.