रोबोट बनले मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र : गाईडसह अन्य भूमिका
दुबई : दुबई एक्सपो 2020 प्रदर्शनाला 12 दिवसांमध्ये जवळपास 4 लाखपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली आहे. येथे प्रदर्शनात भविष्यातील रचना आणि डिझाईन्सचे आकर्षण पहावयास मिळत आहे. सुरुवातीला दरवाजातील गेटपाशी रोबोट येणाऱयांचे स्वागत करतो. दुसरीकडे हे रोबोट गाईड करण्याचेही काम करत आहेत. विविध आकार व रंगाच्या वर्गवारीनुसार विविध रोबोट हे लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. काही मुले तर रोबोटचा हात पकण्याचा प्रयत्न करीत होती. कोरोना संदर्भात सूचना देताना रोबोट मास्क वापरणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे व अन्य सूचना देण्याचे काम करत होते.
शेतीसह अन्य माहिती
एक्सपोमध्ये काही ठिकाणी रोबोटच्या मदतीने शेती करण्यासाठीचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येत होते. तसेच रोबोटिक मॉडेल हे पाणी, हवा आणि उर्जाशी संबंधीत जागृतीसह माहिती देत होते.