भारतीय वंशाचे तीन चालक दुबईत एका दिवसात कोटय़धीश झाले आहेत. हे तिघेही मूळचे केरळचे रहिवासी आहेत. त्यांनी शुक्रवारी मेगा जॅकपॉट लॉटरीच्या माध्यमातून 41 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. जिजेश कोरोथन, शाहजहां कुट्टिकट्टिल आणि शनोज बालकृष्णन यांनी हे तिकीट खरेदी केले होते. लॉटरीची रक्कम तिघांनीही परस्परांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे.
तिन्ही मित्रांनी मिळून लिमोसीन (आलिशान वाहन) चालविण्याचे काम सुरू केले होते. लिमोसीनकरता मोठे कर्ज घेतले होते, परंतु कोरोना संकटामुळे पर्यटनक्षेत्र कोसळले आहे. काम बंद झाल्याने केरळमध्ये परतण्याची तयारी सुरू होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने कार विकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लॉटरी लागल्याने सहजपणे हप्ते भरू. लॉटरीची रक्कम मुलीच्या शिक्षणाकरता खर्च करणार आहे. तर उर्वरित रक्कम लिमोसीन सेवेचा व्यवसाय वाढविण्यासाठी वापरू असे जिजेशने म्हटले आहे.