वृत्तसंस्था/ दुबई
येथे येत्या सोमवारपासून सुरू होणाऱया एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून स्वीसचा 39 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
फेडररने गेल्या आठवडय़ात डोहा येथे झालेल्या टेनिस स्पर्धेत तब्बल 14 महिन्यांच्या कालावधीनंतर आपले टेनिस क्षेत्रातील पुनरागमन केले होते. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गुरूवारी फेडररला बॅसिलासेव्हेलीकडून पराभव पत्करावा लागला होता. फेडररच्या गुडघ्यावर यापूर्वी दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही दुखापत सध्या पूर्णपणे बरी झाली नसल्याने आपण दुबईतील स्पर्धेत खेळणार नसल्याचे फेडररने सांगितले आहे.