वृत्तसंस्था/ दुबई
रशियाचा टेनिसपटू आंद्रे रूबलेव्हने शनिवारी येथे एटीपी टूरवरील दुबई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविताना सर्बियाच्या व्हेसेलीचा पराभव केला. गेल्या दोन आठवडय़ाच्या कालावधीतील रूबलेव्हचे हे दुसरे विजेतेपद आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात रूबलेव्हने व्हेसेलीचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत टीम फ्युज आणि मिचेल व्हिनस या जोडीने तब्बल दोन तासांच्या कालावधीत मेकटीक आणि पॅव्हिक यांचा 6-3, 6-7 (5-7), 16-14 असा पराभव करत दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.