प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
शहरातील वीजपुरवठा खंडित केल्या जाणाऱया भागांमध्ये कणबर्गी, उद्यमबाग, नेहरुनगर, श्रीनगर आणि वडगाव या भागांचा समावेश आहे. या भागांमधील कणबर्गी एक्झीबिशन सेंटर, शिवालय, उद्यमबाग, चेंबर ऑफ कॉमर्स, गुरुप्रसाद कॉलनी, डच इस्टेट, बेम्को, अशोक आयर्न, अरुण इंजिनिअरिंग, एकेपी औद्योगिक वसाहत, गॅलेक्सी, जीआयटी, शांती आयर्न, जैतनमाळ, भवानीनगर, इंडाल, वैभवनगर, अशोकनगर, सुभाषनगर, विश्वेश्वरय्यानगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, जिनाबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल, श्रीनगर, महांतेशनगर, चन्नम्मा सर्कल, आयसीएमआर, अंजनेयनगर, सदाशिवनगर व वडगाव येथील वीजपुरवठा रविवारी दिवसभर खंडित राहणार आहे.